जळगावकरांसाठी आनंदाची बातमी!
उद्या, १० ऑगस्टपासून नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. या गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवणार असून, खास म्हणजे भुसावळ आणि जळगाव येथे थांबा मिळाल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वी गाडीचे वेळापत्रक जाहीर झाले होते, मात्र भाड्यांची माहिती नव्हती. आता तिकीट दरही जाहीर झाले आहेत.
📌 पुणे ते जळगाव :
- चेअर कार – ₹1020
- एक्झिक्युटिव्ह कार – ₹2035
📌 अजनी ते जळगाव :
- चेअर कार – ₹940
- एक्झिक्युटिव्ह कार – ₹1880
पहिल्या दिवशी ही गाडी 01001 (नागपूर–पुणे) क्रमांकाने धावेल. त्यानंतर नियमितपणे 26101 (पुणे–अजनी) आणि 26102 (अजनी–पुणे) या क्रमांकाने धावणार आहे.
१० ऑगस्टचे वेळापत्रक:
- भुसावळ आगमन – दुपारी ३:५५
- जळगाव आगमन – दुपारी ४:२६
💺 वंदे भारतचे संपूर्ण भाडेदर
गाडी क्र. 26101 (पुणे–अजनी)
- पुणे–अजनी : चेअर कार ₹1595 | एक्झिक्युटिव्ह कार ₹3185
- पुणे–जळगाव : चेअर कार ₹1020 | एक्झिक्युटिव्ह कार ₹2035
- पुणे–भुसावळ : चेअर कार ₹1070 | एक्झिक्युटिव्ह कार ₹2130
गाडी क्र. 26102 (अजनी–पुणे)
- अजनी–भुसावळ : चेअर कार ₹895 | एक्झिक्युटिव्ह कार ₹1785
- अजनी–जळगाव : चेअर कार ₹940 | एक्झिक्युटिव्ह कार ₹1880

0 Comments